का.सिरसी (ता. निलंगा) लातूर जिल्हा प्रतिंनिधी –  विशाल मुंडे

दि.15 आमदार अभिमन्यू पवार यांनी तहसील कार्यालय, का.सिरसी येथे बैठक घेऊन कासार सिरसी मंडळातील मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाचा आढावा घेतला. “शेतरस्त्यांप्रमाणेच फळबाग लागवडीचा औसा पॅटर्न विकसित करायचा असून त्यासाठी गाव ते तालुका पातळीवरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी झोकून देऊन एकजुटीने काम करावे. विशेष करून तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी १ टीम बनून काम करावे. प्रत्येक गावात किमान ५० एक्कर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात यावी जेणेकरून पीक विमा संरक्षण घेणं व उत्पादन बाजारात पाठवणं सोपं होईल” अशा सूचना देण्यात आल्या. या बैठकीत सर्व सरपंचांनी त्यांना येत असलेल्या समस्या मांडल्या.

आमदार अभिमन्यू पवार यांनी घेतलेल्या बैठकीला जिल्हा कृषी अधिकारी श्री दत्तात्रय गावसाने, निलंगा उपविभागीय अधिकारी श्री विकास माने, तहसीलदार श्री गणेश जाधव, गटविकास अधिकारी श्री अमोल ताकभाते, तालुका कृषी अधिकारी श्री राजेंद्र काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कासार सिरसी मंडळातील सर्व सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक उपस्थित होते.


विद्युत खांबावरील तार तुटून पाच वर्षाच्या चिमुकल्याचा करंट लागून मृत्यू ! वाचा सविस्तर !

धक्कादायक बातमी! वांग्याची भाजी का केली नाही म्हणून पत्नीला रॉकेल टाकून पेटवले ?

शारीरीक संबध – रेखाचे हे विधांन ऐकून लोकांची झोप उडाली होती; वाचून तुम्हालापण धक्का

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय