आमिर खान आणि किरण रावचा घटस्फोट का झाला ? Aamir khan kiran rao divorce reason : –
बॉलीवुडचा सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान (aamir khan )आणि त्याची बायको किरण राव (kiran rao ) या दोघांनी एकमेकांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
आमिर खान व किरण राव या दोघांनी उघडपणे या निर्णयाविषयी सांगितलं आहे. या दोघांच्या घटस्फोटामुळे बॉलीवूड मध्ये एकच खळबळ उडाली आहे. दोघांच्या सह मताने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.
आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्त हिच्या सोबतचा संसार मोडून किरण राव सोबत लग्नाची गाठ बांधली होती. लगान पिक्चर च्या शुटींग दरम्यान या दोघांचं नातं जुळलं होतं. त्यांनी त्यांच्या दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून वैवाहिक जीवनानंतर हा निर्णय घेतला आहे.
आम्हाला आमच्या जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आम्ही आता पती- पत्नी नसून एक पालक म्हणून एकमेका साठी कुटुंबातील सदस्य म्हणून राहणार आहोत. या दोघांच्या घटस्फोटाच खर नेमकं कारण काय आहे ? ते अद्याप समोर आलेलं नाही.
हे पण वाचा :- या अभिनेत्री स्वतःच्या पतीच्या पहिल्या लग्नात किती वयाच्या होत्या ? एक तर 1 वर्षाचीच होती.
आमच्या या पंधरा वर्षा मधील आम्ही घातलेले एकत्रित दिवस आम्हाला अनुभवता आले, आमचं एक नातं विश्वास, आदर आणि प्रेम यावर खूप फुललेलं होतं. आता आम्हाला आमच्या आयुष्यात नवीन पर्व चालू करायचं आहे आम्ही दोघे आता फार काळासाठी पती-पत्नी असं न राहता माता- पिता आणि कुटुंबाच्या रूपात राहणार आहोत.
आमचा मुलगा आझाद याची जबाबदारी आम्ही आई-वडील म्हणून पार पडणार आहोत. त्याचं पालन आम्ही एक सहकारी म्हणून करणार आहोत. अमीर खान म्हणाले आम्ही चित्रपट, पाणी फाउंडेशन आणि इतर प्रकल्पामध्ये एक चांगले सहकारी म्हणून काम सुरू राहणार आहे.
सर्वांना धन्यवाद : आमच्या या नात्यामध्ये आमच्या कुटुंबाचा आणि आमचे मित्र परिवार यांची साथ आहे.
त्यामुळेच आम्ही या दोघांनी हा निर्णय घेण्याचा धाडस केला. त्यामुळे सर्वांचे मनापासून आम्ही धन्यवाद देतो.
आम्हाला आमच्या चाहत्यांकडून शुभेच्छा आणि भरभरून आशीर्वाद मिळण्याची अपेक्षा आहे.
आमच्यासारखं तुम्ही या घटस्पोटाकडे आमचा शेवट म्हणून न पाहता आमच्या जीवन प्रवासाची नवीन सुरुवात म्हणून पहावी.
आमीर खान आणि किरण राव:
या दोघांचं लगान या सिनेमाच्या सेटवर पहिली भेट झाली होती.
किरण राव ही या सिनेमाची सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती.
यादरम्यान ते दोघं एकमेकांच्या संपर्कात हळूहळू येऊ लागले.
काही दिवस एकत्र घालवल्या नंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.
यात दोघांचे लग्न 28 डिसेंबर 2005 साला मध्ये झाले होते.
हे पण वाचा :- शारीरीक संबध – रेखाचे हे विधांन ऐकून लोकांची झोप उडाली होती; वाचून तुम्हालापण धक्का बसेल!
तर 2011 मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांचा मुलगा आझाद चा जन्म झाला होता.
आमीर खानला पहिल्या पत्नी रीना दत्त तिच्यापासून आयरा खान आणि जूनैद खान अशी दोन मुलं आहेत.
आमिर खान आणि किरण राव यांचं दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी मोठं काम:
दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी या दोघांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पालथे घालत शेताच्या बांधावर गेले होते.
‘पाणी फाउंडेशन’ याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मोठी कामे केली आहेत.
या दोघांनी कित्येक गावांमध्ये पाण्याच्या रूपाने नवसंजीवनी त्या त्या गावांमध्ये आणली होती.
ज्या ठिकाणी अनेक दशकापासून माळरान होतं त्याठिकाणी हिरवळ केलं.
आणि त्या गावांचं राहणीमान बदलण्यासाठी खूप मोठा वाटा या दोघांचा आहे.
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा