वृत्तसंस्था, मुंबई : या महिन्याच्या [aajcha havaman andaj] अखेरीपर्यंत देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट पुन्हा येण्याची शक्यता नाही. हवामान खात्याने सोमवारी मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मंगळवार ते 27 एप्रिलपर्यंत जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पावसामुळे तापमानात घट झाल्याने उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
शेतकरी मित्रांनो आज आपण हवामान विभागाचा पुढील काही दिवसात वातावरण कसे असणार आहे?, त्यांचा अंदाज काय आहे? हे पाहणार आहोत. ही माहिती शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची असून कृपया शेवट पर्यन्त वाचून घ्या.
💡 पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा
मित्रांनो राज्यात सातत्याने हवामान बदल होत आहेत. त्यामुळे कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे अवेळी पाऊस अशी परिस्थितिसध्या राज्यात झाली आहे. आधीच बदलते हवामान आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच आणखी राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
🙁 विदर्भात हवामान अंदाज कसा असेल ? aajcha havaman andaj
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, विदर्भात अवकाळी पावसाची तीव्रता जास्त असून या पाच दिवसांत गारपीट होण्याची शक्यता आहे.
😥 मराठवाड्यात हवामान अंदाज कसा असेल ?
मराठवाड्यात गुरुवार आणि शुक्रवारी म्हणजेच २६ एप्रिल आणि २७ एप्रिलला पावसाचा जोर जास्त असेल आणि गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
पुढील पाच दिवस राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या 💡 💡 अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
➡ शेतकरी पाइपलाइन योजना: कृषी पाइपलाइनसाठी 70% अनुदान; येथे अर्ज करा
महाबळेश्वरमध्ये नऊ अंश तापमान
सातारा : महाबळेश्वरमधील वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरात सोमवारी सकाळी नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वरच्या इतर भागातही तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. वीकेंडमुळे गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये गर्दी होत असून, उन्हाळ्यातील थंडीचा आनंद पर्यटक घेत आहेत. महाबळेश्वरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तापमानात चढउतार होत आहे. aajcha havaman andaj
उष्णतेची लाट कमी
रविवारी वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात ३६ ते ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित भारतामध्ये तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले. हवामान खात्याने सांगितले की, पश्चिम हिमालयीन भागात तापमान 15 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले. येत्या सात दिवसांत देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसल्याचेही विभागाने म्हटले आहे.
पश्चिम हिमालयीन प्रदेशात २६ एप्रिलपासून पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर वायव्य मैदानी भागात २८ एप्रिलपासून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू, तेलंगणा, केरळच्या किनारी भागातही मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय 28 एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये पावसाची शक्यता आहे.
सरपंच आणि उपसरपंच यांना आता एवढा पगार मिळणार !
मित्रांनो, ताज्या अपडेट, सरकारी योजना, देशातील चालू परिस्थिती, ट्रेंडिंग, कृषी, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक माहितीसाठी
आमच्या http://www.abcmarathinews.com ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. किंवा व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉइन होऊ शकता.
एबीसी मराठी न्यूजच्या महत्त्वाच्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी या समुदायात सामील व्हा.