डॉ एपीजे अब्दुल कलाम सैटेलाइट लॉन्च व्हीकल मिशन- २०२३” डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन चा उपक्रम असून कलाम कुटुंबीय कलाम सर यांचे स्वप्न पूर्ती साठी हा प्रकल्प राबवित आहे.
जगातील सर्वात मोठी भारतीय विद्यार्थ्यांची मिशन विद्यार्थी बनविणार १५० पिको उपग्रह आणि परत वापरता येणारे रॉकेट या प्रकल्पासाठी पात्रता ५ ते १२ वी पदवीधारक डिप्लोमा इंजिनीरिंग अशी आहे. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड , आशिया बुक ऑफ रेकॉर्ड , इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड , अस्सिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड , एकेआयएफ अशी ५ प्रशस्तिपत्रे दिले जातील.

डॉ एपीजे अब्दुल कलाम सैटेलाइट लॉन्च व्हीकल मिशन- २०२३ हा प्रकल्प भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम सर यांचे भारताचे स्वप्न पूर्ती साठी चे एक पाऊल असून २०२०-२०२१ साली केलेल्या “डॉ एपीजे अब्दुल कलाम पेलोड qubes चालेंज ” प्रकल्पाचा पुढील टप्पा आहे. हा प्रकल्प सरळ हाऊस ऑफ कलाम यांचे संस्था डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन , स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांचे द्वारा राबविला जात आहे.
“डॉ एपीजे अब्दुल कलाम सैटेलाइट लॉन्च व्हीकल मिशन- २०२३” या प्रकल्पात विद्यार्थ्यांचे उपग्रह बनविण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण होईल . तसेच प्रत्यक्ष पिको उपग्रह बनविण्याची कार्यशाळा पुणे आणि नागपूर येथे घेण्यात येईल . उपग्रह बनविण्याच्या कार्यशाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग असेल . ऑनलाईन प्रशिक्षण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची ऑल इंडिया स्तरावर एक परीक्षा सुद्धा होईल. या परीक्षेत प्रथम मेरिट मध्ये येणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष परत वापरात येणारे रॉकेट बनविण्याची संधी मिळेल. या रॉकेट चे वजन २२.५ केजी असेल आणि उपग्रह त्यात फिट केल्या नंतर रॉकेट चे वजन ४५ ते ६० केजी असेल. सदर रॉकेट १९ फेब्रुवारी २०२३ रोजी तामिळनाडू मधील कांचीपुरम जवळील पट्टीपुरं येथून अवकाशात सोडले जाईल . या रॅकेट प्रक्षेपित करण्यासाठी सर्व परवानग्या केंद्र आणि राज्य सरकार कडून मिळविण्यात आल्या आहेत. सदर चे रॉकेट उपग्रह अवकाशात सोडल्या नंतर पॅराशूट चे साहाय्याने परत जमिनीवर लॅन्ड करेल आणि पुढील मिशन साठी परत वापरता येईल. असा प्रयोग अमेरिकेत एलोन मास्क यांनी केला होता. जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांनी १५० पिको उपग्रह सोबत असे रॉकेट हा पहिलाच प्रयोग असल्याने १९ फेब्रुवारी २०२३ रोजी हा भारतीय विद्यार्थ्यांनी केला जागतिक विक्रम , आशिया विक्रम , इंडिया विक्रम , अस्सिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड असे विक्रम स्थापित होतील. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास वरील ४ प्रशस्तिपत्रे दिले जातील. अश्या प्रयोगाने भारतीय विद्यार्थी अवकाश क्षेत्रात भारताचे नाव अभिमानाने नोंदवतील आणि भविष्यात अश्या मिशन मधून डॉ कलाम यांचे सारखे शास्त्रगण्या तयार होण्यास आणि नवीन डेव्हलपद भारत तयार होण्यास हातभार लागेल.
या प्रकल्पा साठी विद्यार्थ्यांचे विविध गट बनविण्यात आलेले आहेत . ५ वि ते १० वि , ११ वि १२ वि , पदवीधर , आणि पॉलीटेकनिक आणि इंजिनीरिंग . शेवटच्या टप्प्यासाठी गटानुसार ऑनलाईन ऑल इंडिया टेस्ट नुसार सर्वमिळून १०० विद्यार्थ्यांची रॉकेट बनविण्यासाठी निवड केली जाईल. सर्व सहभागी विद्यार्थ्यास एकाच प्रकारचे प्रशस्तिपत्रे मिळतील .
जागतिक स्तरावरील या प्रलकपट महाराष्ट्रामधून ५१० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. डॉ कलाम यांचे स्वप्नातील भारत बनविण्याच्या या प्रयत्नासाठी महाराष्ट्र मधून समाजातील सर्व घटकांचा समावेश करून घेण्यात आलेला आहे. यात आदिवासी विद्यार्थी, अतिमगारवर्गीय विद्यार्थी , पोलीस कर्मचाऱ्यांची मुले, विकलांग विद्यार्थी, विविध महापालिकेचे विद्यार्थी, जिल्हापरिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच समाजातील गरीब होतकरू हुशार विद्यार्थी यांचा सहभाग या ५१० विद्यार्थ्यांमध्ये आहे. या शिवाय विविध नामांकित शिक्षण संस्थांचे विद्यार्थी सुद्धा सहभागी झालेले आहेत.
महाराष्ट्र मधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दरम्यान भाषेची अडचण येऊ नये म्हणून खास मराठी मधून येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच कार्यशाळेत सुद्धा मराठी आणि हिंदी मदतनीस सदर प्रकल्पात विद्यार्थ्यांना उपग्रह बनविण्यात सहकार्य करतील .महाराष्ट्र मध्ये हा प्रकल्प मनीषा ताई चौधरी महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशन यांचे नेतृत्वात होत असून श्री मिलिंद चौधरी , सचिव , डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशन हे मार्गदर्शन करीत आहेत.
महाराष्ट्रात दिनांक २० जानेवारी रोजी पुणे, २२ जानेवारी रोजी परभणी आणि २३ जानेवारी रोजी नागपूर येथे एक दिवसीय उपग्रह बांधणीची कार्यशाळा होत आहे. या नंतर मेरिट मध्ये येणारे भारतातील १०० विद्यार्थी चेन्नई येथे जाऊन रॉकेट ची बांधणी करतील . हे रॉकेट १९ फेब्रुवारी २०२३ रोजी पट्टीपुलंम , तामिळनाडू येथून विद्यार्थ्यांनी बनविलेले १५० उपग्रह घेऊन अवकाशात झेप घेईल . सादर चे प्रक्षेपण विद्यार्थ्यां लिव्ह ओंलीने बघण्याची व्यवस्था कलाम कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे . १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील विद्यार्थी पट्टीपुलंम येथे विद्यान दिंडी काढणार आहेत. १५० पेक्षा जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक, शिक्षक सादर प्रसंगी पट्टीपुलंम येथे उपस्थित असतील असे श्री मिलिंद चौधरी कळवतात. . महाराष्ट्रातून श्री साहू संभाजी भरती, श्री मेघश्याम पत्की , श्री राजकुमार भांबरे, डॉ विशाल लिचडे, श्री दिनकर अडाते हि सर्व टीम राज्यसमन्वयक मनीषा ताई चौधरी यांचे सह समन्वय साधून मेहनत करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय