इंदापूर /प्रतिंनिधी :- दि. 03 जुलै मौजे सराटी तालुका. इंदापूर येथे तालुका कृषी अधिकारी इंदापूर अंतर्गत मंडळ कृषी अधिकारी बावडा यांचे मार्गदर्शना खाली महिला शेती शाळा घेण्यात आली.
सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन – श्रीमती कावेरी हिरवे
यावेळी कृषी सहाय्यक श्रीमती कावेरी हिरवे यांनी महिलांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले. कावेरी मॅडम मार्गदर्शन करताना म्हणल्या कि, दिवसेंदिवस रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर बेमाप प्रमाणात झाल्यामुळे आपली शेती विषारी होत चालली आहे. परिणामी त्या शेतीतून पिकणारा भाजीपाला, फळे विषारी होत चालले आहेत. त्यामुळे फळे व भाजीपाला यांची मानवी आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहेत. कॅन्सरसारखे भयानक आजार रासायनिक कीटकनाशके वापरल्यामुळे होताना दिसत आहे. त्यामुळेच मानवी आयुष्यमान कमी झाले आहे.
हे पण वाचा – घेवडा उत्पादकाने २० गुंठेत ६ लाख मिळवले, वाल लागवड माहिती, val lagwad mahiti
रासायनिक कीटक नाशकाला पर्याय :
रासायनिक कीटक नाशकाला पर्याय म्हणून आपल्याच शेताच्या बांधावर आढळणाऱ्या वनस्पतीपासून कमी खर्चात सेंद्रिय कीटकनाशक कसे बनवावे हे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी “दशपर्णी अर्क” कसा बनवावा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक महिलांना श्रीमती कावेरी हिरवे कृषी सहाय्यक यांनी करून दाखवले. प्रत्येक महिलांनी आपल्या शेताच्या बांधावरून दहा वेगवेगळ्या वनस्पतीचा पाला गोळा करून आणला होता. यावेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व आपल्या घरीच अशा प्रकारचे अर्क बनवून रासायनिक कीटकनाशकांचा खर्च कमी करून अर्काचा वापर करण्याचे ठरवले.
हे पण वाचा – चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक ! वाचा सविस्तर..
महिला शेती शाळा यास उपस्थित सर्वच महिला श्रीमती, जनाबाई कोकाटे,सुरेखा कोकाटे, रंजना घोगरे, हर्षदा भोसले, ललिता कदम, सारिका कोकाटे, अनिल कोकाटे, अनिता कोकाटे, मनीषा औताडे,पूनम कोकाटे, अरुणा कोकाटे यांनी कृषी विभागाचे आभार मानले.
OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!
एका माणसाने १.२ लाखात फक्त १२ आंबे विकत घेतले, त्याचे कारण जाणून घ्या !
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा
“परंपरा विश्वासाची”
ABC Marathi न्यूज नेटवर्क
संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
7841913458
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com