एक छोटी मुलगी रस्त्याच्या कडेला आंबे विकत होती अशा अवस्थेत पाहून अमेय नावाच्या व्यक्तीला आश्चर्य वाटले. त्यानंतर त्याने तिच्याकडून 1 लाख 20 हजार रुपयांमध्ये 12 आंबे खरेदी केले. (man bought 12 mango for 1.2 lakh ) म्हणजेच प्रत्येक आंब्याची किंमत दहा हजार रुपये देण्यात आली. त्याचे कारण पण तसेच होते. viral Mango girl
काय झाल झारखंडच्या जमशेदपूर (jharkhand jamshedpur) येथील एका मुलीला ऑनलाइन क्लासेस साठी स्मार्टफोन विकत घ्यायचा होता. या मुलीचे नाव तुळशी कुमारी (viral mango girl) आसून ती 11 वर्षाची आहे. हि मुलगी रस्त्याच्या कडेला आंबे विकते होती.
इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेय नावाच्या व्यक्तीने मुलीला या अवस्थेत पाहून त्याने तिच्याकडून 1 लाख 20 हजार रुपयांमध्ये 12 आंबे खरेदी केले. बुधवारी अमेयने याची रक्कम या मुलीचे वडील श्रीमल कुमार यांच्या खात्यात पाठवले.
अमेय कोण आहेत ?
अमेय मूल्यवान एडुटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांना स्थानिक मीडियाने 11 वर्षीय तुळशीच्या संघर्षांबद्दल माहिती दिली. माध्यमांशी बोलताना मुलीने आपल्या कुटुंबातील आर्थिक अडचणींबद्दल सांगितले.
ऑनलाईन क्लासेसमध्ये जाण्यासाठी स्मार्टफोन असणे आवश्यक होते, त्यामुळे ती रस्त्याच्या कडेला शिक्षण सोडून आंबे विकत होती. या मुलीची जिद्द पाहून अमेय ने आशा प्रकारे मदत केली.
हे पण वाचा -या अभिनेत्री स्वतःच्या पतीच्या पहिल्या लग्नात किती वयाच्या होत्या ? एक तर 1 वर्षाचीच होती.
तुळशी कुमारी मुलीची जिद्द :
तुळशी इयत्ता पाचवी या वर्गात शासकीय शाळेत शिकते. तिची शाळा कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे बंद झाली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अमेयांची मदत घेतल्यानंतर तुळशी म्हणाली की तिने स्मार्टफोन विकत घेण्यासाठी पैसे वाचवण्यासाठी आंबे विकायला सुरुवात केली होती.
परंतु आता तिच्याकडे पैसे असल्यामुळे ती ऑनलाइन वर्गात शिकू शकते आणि तिचा अभ्यास सुरू ठेवू शकते. viral mango girl म्हणून ती आता प्रसिद्ध होत आहे.
हा लेख कसा वाटला जरूर कमेंट मध्ये सांगा-