इंदापूर : प्रतिनिधी – श्रेयश नलवडे
बेडशिंग रोड ते पायल सर्कल पर्यंत (किमी 141/450 ते किमी नं. 142/600) सर्विस रोड चे अपूर्ण असलेले काम पूर्ण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवार ( दि. 21 ) रोजी शेतकरी कृती समितीच्या वतीने सरडेवाडी टोल नाक्यावर शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत टोल फ्री आंदोलन करण्यात आले. indapur toll naka sardewadi news
प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी हस्तांतरित केलेल्या ठिकाणी सर्विस रोड नसल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल वाहून नेण्यास अशक्य होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच ऊस रस्त्यावर चढवताना आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून पावसाळ्यात ठीक-ठिकाणी पाणी साचून राहिल्याने अनेकांना दळणवळण करण्यास प्रचंड अडचणी येत आहेत.त्यामुळे सदरील ठिकाणच्या अडचणी संदर्भात परिसरातील नागरिक पाच ते सहा वर्षापासून पाठपुरावा करीत असून त्याची अद्याप पर्यंत दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले असल्याचे यावेळी शेतकरी कृती समितीकडून सांगण्यात आले.
यावेळी सर्विस रोड झालाच पाहिजे,टोल प्रशासनाचा निषेध असो, मुर्दाबाद मुर्दाबाद टोल प्रशासन मुर्दाबाद,इंदापूर शेतकरी कृती समितीचा विजय असो अशा घोषणाबाजी उपस्थित शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
हे हि वाचा – आनंदी,निरोगी आणि सकारात्मक विचारासाठी योगाला महत्व – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
दरम्यान टोल प्रशासनाचे चिटणीस व शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये बैठक दुपारी दीड वाजता आयोजित करण्यात आली असून तोपर्यंत टोल फ्री राहणार आहे.या बैठकीत तोडगा निघाला नाही तर पुन्हा आंदोलन होणार असल्याचे यावेळी कृती समिती कडून सांगण्यात आले.
हे हि वाचा –रेखाचे हे विधांन ऐकून लोकांची झोप उडाली होती; वाचून तुम्हालापण धक्का बसेल!
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
📲7841913458