इंदापूर (जि. पुणे ) प्रतनिधी : – स्वप्नील सावंत ‘इंदापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष’ यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली की, मा. राहुल गांधी यांचा १९ जून रोजी वाढदिवस असून हा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. (‘sankalp Diwas’ In indapur taluka congress committee celebration- Swapnil Savant)
त्याच पार्श्वभूमीवर आधारित काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा ५१ वा वाढदिवस ‘इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे’ विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. इंदापूर शहरातील फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यापारी तसेच विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना स्वतःच्या हाताने काँग्रेसच्या सर्व पद अधिकाऱ्यांनी मास्क घातले.
इंदापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील सावंत स्व्तःच्या हाताने मास्क घालताना.
तसेच विना मास्क फिरणार्यांना गांधीगिरी स्टाईल मध्ये मास्क घालण्याचे महत्व पटवून दिले. यावेळी ५०१ पक्षाचे चिन्ह असलेले मास्क वाटप करण्यात आले.
तसेच इंदापूर शहरातील इरिगेशन कॉलनी येते घरोघरी जांभूळ या फळझाडांची रोपे वाटप करण्यात आली. त्याच कॉलनीत असलेले श्री गणेश मंदिर परिसरात विविध फळांची व सावली देणारी रोपे लावण्यात आली.
यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत म्हणाले की, शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी, रोजगारी हटवण्यासाठी, देशाला वाचवण्यासाठी, आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते राहुलजींना सत्तेत आणण्याचा निर्धार करत आहे. तसेच कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी गरीब कुटुंबांनाही ‘इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे’ मदत करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती स्वप्नील सावंत यांनी दिली.
आजचा दिवस हा ‘संकल्प दिन’ म्हणून इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी साजरा करत आहे.
यावेळी इंदापूर शहर अध्यक्ष – चमन भाई बागवान, महिला तालुका अध्यक्ष – सीमा कल्याणकर, जिल्हा सरचिटणीस – जकिर भाई काजी, भगवानराव फासगे, महादेव लोंढे, निवास शेळके, दत्तात्रय देवकर, मिलिंद साबळे, सुफियान खान जमादार, संदीप शिंदे, समीर शेख, तुषार चिंचकर आधी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !