विद्या प्रवेश बाल वाटिका (सीबीएससी पॅटर्न) इंदापूर मध्ये चैतन्य आणि ऊर्जेचे प्रतीक असलेला लाल रंग दिवस अतिशय उत्साहामध्ये पार पडला. अडीच ते सहा वयोगटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना विविध रंग ओळखणे आणि रंगांचे आपल्या जीवनामध्ये असलेले महत्त्व जाणून घेण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये राबविले जातात. या दिवशी शाळेमध्ये सर्व शिक्षक आणि विद्यार्थी लाल रंगाच्या पोषाखा मध्ये आले होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्याबरोबर लाल रंगाच्या इतर अनेक वस्तू आणल्या होत्या संपूर्ण शाळा लाल रंगाने सजविण्यात आली होती. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांनी खाण्यासाठी आणि पिण्यासाठी लाल रंगांचे पदार्थ आणले होते. विद्यार्थ्यांनी लाल रंगाची गोष्ट ऐकली, लाल रंगाच्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी ताल धरला. ज्योती अतुल घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये विद्यार्थ्यांमधील विविध कौशल्य विकसित करणारे, अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबविले जातात.
शितल डोंगरे मॅडम यांच्या सहकार्याने, शाळेतील विद्यार्थ्यांनी ऊर्जा, साहस, महत्त्वाकांक्षी, राग, उत्तेजना, उत्साह आणि पराक्रमाचे प्रतीक असणाऱ्या लाल रंगा विषयी अतिशय नाविन्य पद्धतीने हसत-खेळत माहिती मिळवली.