पुणे: वटसावित्री पौर्णिमे निमित्त इंदापूर शहरातील इरिगेशन कॉलनी येथे वृक्ष संजिवनी परिवार व इंदापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मोकळ्या जागेमध्ये गुरुवारच्या संधेला सुमारे दीडशे ते दोनशे देशी झाडांच्या रोपांचे रोपण केले. तत्पूर्वी इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा .श्री. रमेश ढगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबी द्वारे खड्डे खोदण्यात आले. परिवारातील सदस्यांनी तरंगवाडी येथील शासकीय नर्सरी येथून तसेच झाडांच्या भिशीच्या माध्यमातून जमा झालेल्या वर्गणीतून कळस येथील नर्सरीतून वड, पिंपळ,खया, चिंच, कवट, मोहोगणी बहावा, बकुळ, सिताफळ व बांबू इत्यादी विविध प्रकारचे देशी झाडांची रोपे आणली. वटसावित्री पौर्णिमेच्या सणाला वटवृक्षाला पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया पूजन करतात आजही आपल्या समाज मनातून या सावित्रीची प्रतिमा पुसली जात नाही आज जंगले नष्ट होऊन सिमेंटची असंख्य जंगली तयार झालेली आहेत त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला असून पृथ्वीतलावरील तापमान वाढीचे उच्चांक केला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपल्या देशातील व राज्यातील तापमानात वाढ झाल्यामुळे अनेक पशुपक्ष्यांचे तसेच मानवांचे उष्माघाताने बळी गेले आहेत. याचाच बोध घेऊन वृक्षारोपणासाठी व वृक्ष जगविण्यासाठी तसेच आपल्या भावी पिढीच्या भवितव्याचा विचार करून काळाची गरज ओळखून इंदापूर शहरातील वृक्षप्रेमींनी एकत्रित येऊन झाडाच्या भिशीच्या माध्यमातून वृक्ष संजीवनी मित्र परिवाराची स्थापना केली. त्याचाच एक भाग म्हणून आज हा वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. येथून पुढेही इंदापूर शहरात विविध ठिकाणी मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून आपले शहर स्वच्छ व सुंदर हरित करण्याचा संकल्प केला आहे. वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून त्याची पूजा करण्यापेक्षा कोणत्याही सात झाडांची रोपे लावा त्याला वाढवा जगवा आधुनिक सावित्रीबाई आणि सावित्री पासून ज्योतिबांच्या सावित्री पर्यंत सर्वांचे स्मरण करून झाडे लावा झाडे जगवा व वसुंधरेला तसेच भावी पिढीला वाचवा,
एक झाड देशासाठी! एक झाड मातीसाठी! पुढील पिढीच्या भवितव्यासाठी
!असा संदेश वृक्ष संजीवनी मित्र परिवारातर्फे देण्यात आला.
याप्रसंगी वृक्ष संजीवनी परिवाराचे सदस्य श्री विकास भोसले यांच्या वाढदिवसा निमित्त केक न कापता पाच झाडे लावून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून तसेच शंकर हाऊसिंग सोसायटी येथील रहिवासी श्री व सौ उज्वला प्रकाश गायकवाड यांचा मुलगा सुरज याच्या लग्न कार्यानिमित्त सोसायटी परिसरामध्ये गायकवाड कुटुंब व परिवारातील सदस्यांनी पाच झाडे लावून लग्नकार्याची सुरुवात केली. याप्रसंगी वृक्ष संजिवनी परिवाराच्या संयोजिका सायरा आत्तार ,इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष सौ अलका ताटे, सौ सविता बंगाळे, अंकिता शहा, व परिवाराच्या सदस्या कल्पना भोर माधुरी मंदरे, शुभांगी खंडागळे जाधव मॅडम, जयश्री खबाली अर्चना शिंदे सुनंदा आरगडे अनिता सोनवणे रश्मी निलाखे,अर्चना काळपांडे सुरेखा ननवरे, लता नायकुडे, योजना वाघमारे, जलसंपदा विभागातील शाखा अभियंता श्रीमती पूजा शेणवी, सौ मनीषा पवार, तसेच चंद्रकांत देवकर, धरमचंद लोढा,प्रशांत शिताप, सचिन मोहिते, नवनाथ नरुटे, हमीदभाई आतार, इंदापूर नगर परिषदेचे अशोक चिंचकर, शेखर लोंढे,चंद्रकांत शिंदे, धनाजी भोंग,शिवाजी मखरे विकी वाल्मिकी व इतर सदस्य उपस्थित होते.