मुंबई – नमस्कार शेतकरी मित्रांनो, खास शेतकरी बांधवांसाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना’ आहे. या योजनेचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना या योजने बद्दल माहीती असणे गरजचे आहे. या आजच्या ब्लॉग मध्ये आपण सविस्तर या योजने बद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो ही माहिती सर्व शेतकरी बांधवा पर्यन्त पोहचली पाहिजे. त्यासाठी आपण हि पोस्ट शेयर करा. तर आता पाहू आपण या योजनेबद्दल.
गेल्या काही वर्षांपासून सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. राज्यात काही वर्षांपासून शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत होता. मात्र, विमा कंपनी या योजनेची योग्य अंमलबजावणी करत नव्हती. यामुळे ही योजना बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी एप्रिलमध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात संरक्षण योजना Gopinath munde apghat vima yojana सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्याला कधी ? आणि कसा मिळणार? हे आपण आज जाणून घेणार आहोत…
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात संरक्षण योजना काय आहे? वाचा…
राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात संरक्षण मदत अनुदान योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये आणि अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेत 12 प्रकारच्या अपघाती मृत्यूंचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘हे’ काम केले नाही तर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही
परंतु ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही आणि ज्यांचे नाव सातबारावर नाही परंतु ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे, अशा कुटुंबातील कोणतीही व्यक्ती अर्ज करू शकते. परंतु अर्जदाराचे किमान वय 10 वर्षे आणि कमाल वय 75 वर्षे असावे.
खाली दिलेल्या ‘अपघात’ लाभासाठी पात्र…
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात संरक्षण योजना लाभ घेण्यासाठी कोणत्या प्रकारचे अपघात यात सामील आहे. मित्रांनो एकूण 12 प्रकारच्या आपघातचा समावेश या योजनेत केला आहे.
1) रस्ता किंवा रेल्वे अपघात.
२) पाण्यात पडून मृत्यू.
३) विष खाणे.
4) विजेचा धक्का लागल्याने अपघात.
5) वीज पडून मृत्यू.
6) उंचीवरून पडून अपघात.
7) सर्पदंश आणि विंचू चावल्याने मृत्यू.
8) नक्षलवाद्यांकडून हत्या.
९) जनावरांच्या चाव्यामुळे इजा किंवा मृत्यू.
10) बाळंतपणात मृत्यू.
11) दंगा.
12) खून.
या प्रकारे शेतकरी बांधवाचा अपघात झाला असेल तर या योजनेचा लाभ घेता येतो. gopinath munde apghat vima yojana
मित्रांनो, अशाच प्रकारची नव नवीन माहिती अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन व्हा! फक्त एका क्लिकवर आपणास फ्री मध्ये whatsapp वर ताज्या अपडेट्स मिळतील.
अशीच माहितीसाठी आमच्या http://www.abcmarathinews.com ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.
आमच्या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये जॉईन व्हा
हे पण वाचा ….