beed news

बीड:  केज तालुक्यातील पैठण सावळेश्वर येथे शेतातील पाणी साठवण्यासाठी बांधण्यात आलेल्या हौदात बुडून तीन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान पैठण शिवारात घडली होती. या घटनेबद्दल समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

चिमुकल्यांचे मृतदेह पाहून गावकऱ्यांनीदेखील हंबरडा फोडला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.केजपासून १५ किमी अंतरावर असलेल्या पैठण सावळेश्वर येथील चुलत्याच्या शेतातील ज्वारी काढण्यासाठी तीनही बालकांच्या आई गेल्या होत्या. दुपारचे जेवण केल्यानंतर या तीनही बालकांना तेथून जवळच असलेल्या झाडाखाली थांबवून सर्वजण ज्वारी काढण्यात व्यस्त झाले.

हे पण वाचा :- कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?

तिन्ही मुले खेळत होती. जवळच ६ फुटांचा हौद होता. त्यात ५ फूट पाणी होते. खेळता खेळता एकाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी बाकीचे दोघेही पाण्यात उतरले.तिघांनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. स्वराज जयराम चौधरी (९ वर्ष), पार्थ श्रीराम चौधरी (७ वर्ष) आणि कानिफनाथ गणेश चौधरी (७ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच युसूफवडगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, एएसआय डोईफोडे, जमादार म्हेत्रे व घोरपडे यांनी घटनास्थळी जाऊन तीनही बालकांचे मृतदेह हौदाबाहेर काढून बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून पैठण गावावर शोककळा पसरली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

विशेष म्हणजे मृत पावलेले तिघेही सख्खे चुलत भाऊ आहेत. पैकी एका मुलाला एक भाऊ आहे, तर दोघांना बहिणी आहेत. एकाच परिवारातील तीन चिमुकल्यांच्या अकाली निधनामुळे चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची स्थिती पाहून गावातील अनेकांचे डोळे पाणावले. ही घटना वाऱ्यासारखी गावासह केज तालुक्यात पसरली. त्यानंतर आसपासच्या गावांतील रहिवासी बघता बघता घटनास्थळी दाखल झाले. चिमुकल्यांचे निष्प्राण देह पाहून सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय