इंदापूर प्रतिनिधी: गोविंद पाडुळे
लोकसेवक गणपतराव आवटे फाउंडेशन यांच्या माध्यमातून बावडावेस माळी गल्ली येथे अंगणवाडी क्र.53 मध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, खेळणी वाटप, तसेच चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना फाउंडेशनचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास आयुक्तालय पुणे येथील मुख्यसेविका श्रीमती राधिका अर्जुन पाडूळे यांचा आदर्श महिला अधिकारी म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच पाडूळे मॅडम यांनी आवटे फाउंडेशन हे प्रत्येक सामाजिक कामात अग्रेसर असते या सामाजिक कामाचे दखल घेत त्यांनी फाउंडेशनचे होत असलेल्या कामाबद्दल आभार मानले व पुढीलकमास शुभेच्छा दिल्या.
लोकसेवक गणपतराव आवटे फाउंडेशन मार्फत रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण असे विविध सामाजिक कार्यक्रम नेहमीच सुरू असतात.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर आवटे, ॲड. आनंद केकाण, रुपेश पवार, राधिका पाडूळे, सौ. उषा शिंदे, सौ. कांचन गाडेकर, विशाल करडे, सोमनाथ लांडगे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.