पुणे, 17 डिसेंबर:  दहा वर्षांच्या मुलाचं आयुष्य एखाद्या परिकथेप्रमाणे बदललं आहे. उत्तराखंडमधल्या एका दर्ग्याच्या बाहेर भीक मागणारा 10 वर्षाचा मुलगा झाला रातोरात अमीर. फिल्मी कथानका प्रमाणे या गरीब-अनाथ मुलाच्या आयुष्यात बदल झाला आहे. दररोज भीक मागून आपली कशीबशी गुजराण करणारा हा मुलगा एका रात्रीत कोट्यधीश झाला आहे. तुम्ही एकूण थक्क व्हाल 10 वर्षांचा मुलगा एका रात्रीत करोडो रुपयांच्या मालमत्तेचा मालक झाला आहे. एका वर्षापूर्वी तो आपल्या कुटुंबापासून दुरावला होता. त्यानंतर तो दर्ग्यात भीक मागू लागला. या मुलाचं सत्य समजल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

या मुलाची पार्श्वभूमी ?

या मुलाचं नाव शाहजेब आलम असं आहे. तो उत्तर प्रदेशातल्या सहारणपूर मधल्या पंडोली गावातला मूळचा रहिवासी आहे. शाहजेब आलम जवळपास एक वर्षापासून उत्तराखंडमधल्या पिरान कालियार दर्ग्याबाहेर दररोज भीक मागून आपला कसाबसा उदरनिर्वाह करत होता. झालं असं की, 2019 मध्ये दीर्घ आजाराने या मुलाच्या वडिलांचं निधन झालं होतं.

हे पण वाचा:- माणसाला जिवंत गिळताना दिसला अवाढव्य अजगर; VIDEO पाहूनच अंगाचं पाणी पाणी होईल.

वडिलांच्या मृत्यूच्या काही महिने अगोदर शाहजेबची आई इमरानाने आपल्या पतीला सोडलं होतं. म्हणजे शाहजेब च्या आई-वडिलांचा तलाक झाला. बिचारा १० वर्षाचा शाहजेब ची मानसिकता काय असेल तुम्हाला विचार करून मन सुन्न करेल. त्यांनतर या मुलाची आई आपल्या माहेरी शाहजेब सोबत राहत होती. नंतर ती शाहजेबसोबत पिरान कालियार इथे राहायला गेली आणि उदरनिर्वाहासाठी लहान-मोठी कामं करत होती. 2021 मध्ये या मुलाच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तेव्हापासून हा मुलगा एकाकी पडला होता.

कोट्याधीश झाला कसा ?

जेव्हा शाहजेब एकदम निराधार झाला तेव्हा त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला सुफी संप्रदायाच्या पिरान कालियार इथल्या प्रतिष्ठित तीर्थक्षेत्रात आश्रय घेण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून शाहजेब तिथे भीक मागून जगत होता. यादरम्यान, 2021 मध्येच शाहजेबच्या आजोबा मोहम्मद याकूब (वडिलांचे वडील) यांचा मृत्यू झाला. याकूब यांनी आपल्या मृत्युपत्रात आपल्या स्थावर मालमत्तेचा काही भाग त्याचा दिवंगत मुलगा नावेदचा मुलगा शाहजेबच्या नावे केला. मृत्यूपत्रानुसार 5 बिघा जमीन आणि दुमजली घर शाहजेबच्या नावावर झालं. या मालमत्तेची किंमत दोन कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.

अनोखा विश्वविक्रम : एकाच वेळी ९ मुलांना दिला जन्म; वर्षभरानंतर आईसह बाळं सुखरुप

या मुलचा शोध कसा केला ?

शाहजेब त्याच्या वडिलांच्या मृत्यूच्या अगोदरपासूनच कुटुंबीयांपासून दुरावला होता. त्याच्या आजोबांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी शाहजेबचा चौफेर शोध सुरू केला. तो पिरान कालियारमध्ये भीक मागून जगत असल्याची माहिती त्यांनी मिळाली. त्यांनी लगेच तिथे जाऊन त्याला घरी परत आणलं. सध्या तो आपल्या कुटुंबीयांसोबत राहत आहे.

शाहजेबचे नातेवाईक शाह आलम यांनी सांगितलं, “आम्हाला शाहजेब परत मिळाला ही आमच्या कुटुंबासाठी सणापेक्षा मोठी गोष्ट आहे. तो आम्हाला मिळेल अशी आशाही आम्ही सोडून दिली होती. आम्ही त्याचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता; पण त्याचा फारसा फायदा झाला नाही; पण आता तो आम्हाला परत भेटला आहे. तो हळूहळू सर्वांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला थोडा वेळ लागेल. एवढ्या लहान वयात त्यानं बरेच चांगले-वाईट अनुभव घेतले आहेत.

https://abcmarathinews.com/viral-news-2/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय