प्रतिनिधी : राधानगरी
सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ऐन थंडीत वातावरण गरम झाले आहे. त्याला राधानगरी ही अपवाद नाही, राधानगरीच्या राजकारणकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असतं कारण इथे गटा-तटा चे इर्षेचे आणि चुरशीचे राजकरण असतं..राधानगरी ग्रामपंचायती साठी उद्योजक गोकुळचे विद्यमान संचालक मा.अभिजित प्रभाकर तायशेटे, राजाराम साखर कारखान्याचे माजी संचालक सुधाकर दादा साळुंखे भाजपचे तालुका अध्यक्ष संभाजी आरडे, मनसेचे तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण या सर्वांनी एकत्र येऊन आपली सत्ताधारी आघाडी या रणधुमाळीत उतरवली आहे. तर दुसरीकडे युवा नेते राजाराम पांडुरंग भाटळे यांनी आपले पॅनल उभा केले आहे.
१०-१५ दिवसांचा प्रचाराचा ओघ पाहता, दोन्ही आघाड्या संपूर्ण ताकदीने प्रचार करताना दिसून आल्या. सत्ताधारी आघाडी कडून उद्योजक दादासो सांगावकर तर विरोधी आघाडी कडून आघाडी प्रमुख राजाराम भाटळे यांच्या पत्नी सौ. सविता भाटळे यांना रिंगणात उतरवले. १० वर्ष गावच्या राजकारणात सरपंच पद भूषवत सक्रिय असलेले दादा सांगावकर यांना उमेदवारी दिल्यामुळे व्यापारी संघटना आणि स्थानिक लोकांमधून नाराजीचे सुर उमटू लागले. आणि त्याला कारणे देखील तशी आहेतच. एकीकडे विरोधी आघाडी प्रचार जोमाने करताना दिसली पण सत्ताधारी आघाडीने मात्र व्यक्तिशः टीका टीपण्णीचे राजकारण केले. याचे परिणाम पाहता, प्रचारासाठी मुद्दा नाही असे लोकांचे मत निर्माण झाले.
आणि यात भर म्हणून सत्ताधारी आघाडीने बाहेरून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा राजकारणात वापर करत ११८ बोगस मतदाने नोंदवली यामुळे नागरिकांमधून प्रचंड खंत व्यक्त केली जात आहे.
व्यक्तिशः राजकारण, बोगस मतदाने आणि सत्तेत असताना केलेला चष्मा घोटाळा, यात्रिनिवास फर्निचर घोटाळा, १ कोटी ५४ लाखांची थकबाकी अश्या केलेल्या घोटाळ्यावर विरोधी आघाडीने प्रकाश टाकला.
तर सत्ताधारी आघाडीने हे आरोप खोटे आहेत असे म्हणत २०१२ ते २०१७ कालखंडात केलेले जॅकवेल पाइप लाइन दुरुस्तीचा घोटाळा असे काही १० वर्षामागील मुद्दे,यासोबत सरपंच उद्घाटनाला आल्या का नाहीत असे पोकळ आरोप करत लोकांसमोर मत मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. भाटळे यांच्या आघाडी कडून जनमानसांसाठी केलेल्या कामांचे पुरावे देण्यात आले. पण सत्ताधारी आघाडी कडून मात्र लाट्या काट्या, तलवारी, भांडण अशा जहाल भाषेत टीकाटिप्पणी केल्याने लोकांतून प्रचंड नाराजीचा सूर दिसून आला.
शेवटी गावच्या राजकारणातला महत्वाचा दुवा असलेली तरुणपिढी राजाराम भाटळे यांच्या बाजूने असून त्यांचा प्रचार जोमाने करताना दिसली. पण सत्ताधारी आघाडीने मात्र तरुण पिढीची साथ नसल्याने अधिकार सांगत आपल्याच कॉलेज मधील विद्यार्थांचा वापर प्रचारासाठी केला. आणि हे कुठेतरी गावच्या राजकारणात लज्जास्पद ठरले. राधानगरी हा ग्रामीण भाग विकसनशील परिसर आहे या ठिकाणी ५ वर्षानंतर ग्रामपंचायतीत सत्तांतर अटळ आहे कारण २०१२ पूर्वी तायशेटे गटाची सत्ता होती, नंतर राजाराम भाटळे यांनी आपले पॅनल उभा केलं आणि १३ -० झाले आणि पूर्ण पॅनल निवडून आणले परत २०१७ ते २०२२ साठी ग्रामपंचात निवडणूक लागली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला, आता हे पाच वर्ष भाटळे पर्वासाठी चांगलेच आणि सुगीचे ठरणारे आहेत असे जनमाणसातून बोलले जात आहे. पुन्हा १६ – ० ची पुनरावृत्ती करून भाटळे गट प्रभावशाली होणार असे काही लोकांनी पैजा लावत आपली मते मांडली आहेत