पाटबंधारे वसाहत इंदापूर, ता. इंदापूर, जि.पुणे येथे खडकवासला प्रकल्प सिंचन व्यवस्थापन उपविभाग व शाखा कार्यालय, भीमा उपसा सिंचन उपविभाग क्र. २ इंदापूर व चार शाखा कार्यालय, तसेच उजनी जलविद्युत विभागाचे विभागीय कार्यालय आहेत. त्याचबरोबर वरील सर्व कार्यालयातील मिळून जवळपास 50 कर्मचारी वसाहती मधील निवासस्थानामध्ये राहत आहेत.
चालू वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने वरील सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन हा महोत्सव अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने व उत्साहाने येऊन साजरा केला.
पाठबंधारे वसाहत इंदापूर येथे विविध शासकीय कार्यालयांचे ध्वजारोहण महिला /मुली, पुरुष /मुले ,विद्यार्थी/ विद्यार्थिनी यांचे स्पर्धा व विविध गुणदर्शन कार्यक्रम दिनांक 13,14 व 15 ऑगस्ट या तीनही दिवशी सर्वांनी एकत्र येऊन ध्वजारोहण केले.
तसेच ध्वजारोहणासोबतच झेंडापोल व कार्यालय परिसर स्वच्छता, रंगरंगोटी, आकर्षक स्तरावर सजावट करण्यात आली. तसेच कार्यालयातील महिला/ मुलींसाठी, पुरुष/मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व विजयी स्पर्धकांना प्रोत्साहनपर आकर्षक बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेनंतर महिला कर्मचारी, पुरुष कर्मचारी व मुलांना अल्पोपहार देण्यात आला.
पाटबंधारे वसाहतीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुला मुलींचे समूह गान व देशभक्तीपर गीतांचा तसेच विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. वसाहती मधील सर्व कर्मचाऱ्यांनी हर घर तिरंगा मध्ये भाग घेऊन प्रत्येकाने आपापले घरावर दिनांक 13/8/ 2022 ते 15/8/ 2022 पर्यंत राष्ट्रीय ध्वज उभा केला. हर घर तिरंगा या अंतर्गत 75 वा राष्ट्रीय ध्वजांचे मोफत वाटप श्री विराज जगदीश परदेशी स.अ.श्रे.1 व श्री प्रशांत हराळे शा. अ. यांनी त्यांच्यातर्फे केले.
तर दि १५ ऑगस्ट रोजी भीमा उपसा सिंचन उपविभाग क्र. २ इंदापूर या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री रवींद्रकुमार ईश्वर जगताप यांच्या तर्फे मुलांना अल्पउपहार देण्यात आले. इतर सर्व कार्यक्रम वरील सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यातून पार पडले.
उजनी जलविद्युत विभाग इंदापुरचे वाहनचालक श्री मंगेश खरात यांनी रांगोळीतुन साकारले भारतमातेचे चित्र
सदर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा कार्यक्रम व हर घर तिरंगा हा कार्यक्रम पार पडण्यासाठी श्री विराज परदेशी स. अ. श्रे. 1 व श्री प्रशांत हराळे शा. अ. सचिन लोंढे, बापू नलवडे तसेच भीमा उपसा सिंचन उपविभागाचे श्री जगताप साहेब उप.अभि., श्री तांबोळी व श्री.सरडे शा. अ., श्री. डी.एम.गिरी, श्री एन.आर.मनाळे, श्री. सचिन मोहिते, श्री अजित कदम, श्री .संदीप देवकर, तसेच जलविद्युत विभागाचे श्री नरोटे भांडार लिपिक, सरडे कनिष्ठ अभियंता, अमोल गायकवाड कनिष्ठ लिपिक यांनी विशेष मेहनत घेतली व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना सहकार्य केले व सर्वांनी मिळून आनंदोत्सव साजरा केला.
हे पण वाचा-
देशाला तिरंगा कोणी दिला? आपण विसरलो; गरीबीत जगले, मृत्यूवेळी रुपया नव्हता…
चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक !
आशोक चक्र नसलेला ध्वज लावला…जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या…