इंदापूर : तालुकास्तरीय सर्व शासकीय समित्यांचे कामकाज सुरू करा; काँग्रेसची मागणी
तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शासकीय समित्या ह्या तालुका व जिल्हा पातळीवरील खात्यांचे कामे सुरळीत व पारदर्शक चालण्यासाठी जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने समित्या गठित करण्यात येतात. ह्या विविध खात्यांच्या समित्या गेल्या वर्षी गठीत झालेले आहेत. तसे ज्यांची या समित्या वरती निवड झालेली आहे असे अनेक जणांना पत्रही आलेले आहेत. परंतु शासन स्तरावर यांचे अद्याप कामकाज सुरू झालेले नाही. यामध्ये संजय गांधी निराधार योजना समिती या केवळ एकमेव समितीचे कामकाज सुरू असून दर महिन्याला याची आढावा बैठक तहसीलदारांच्या उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार श्रीकांत पाटील यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणली. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व सुशासन आणण्यासाठी या समित्यांचे कामकाज सुरू करणे अत्यंत गरजेचे असून ते लवकरात लवकर सुरू करावे अशी विनंती काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. यामुळे लोकांच्या असणारी विविध खात्यातील विविध कामे मार्गी लागण्यास मदत होईल.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस जाकीर भाई काजी , शहराध्यक्ष चमनभाई बागवान, किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष होगले, तालुका सरचिटणीस श्रीनिवास शेळके, महादेव लोंढे, प्रदीप शिंदे, चेतन कोरटकर, संतोष आरडे, राहुल वीर, राहुल जाधव, खजिनदार भगवान पासगे, अनुसूचित जाती जमाती विभागाचे तालुका अध्यक्ष युवराज गायकवाड, जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश पवार, श्रीनिवास पाटील, तुषार चिंचकर, समीर शेख आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय