निलंगा / प्रतिंनिधी – शिव संवाद टप्पा क्रमांक दोन
माननीय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिव संवाद टप्पा क्रमांक दोन राबवण्यात येत आहे.
या अनुषंगाने शिवसेनेचे नेते तथा मराठवाड्याचे संपर्क नेते मा. खासदार चंद्रकांत खैरे साहेब शिवसेनेचे उपनेते तथा मराठवाडा समन्वयक मा. विश्वनाथ जी नेरुरकर साहेब व लातूर जिल्हा संपर्कप्रमुख मा. संजय मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक.१०जानेवारी२०२२ रोजी ता. निलंगा येथील सरवडी जिल्हा परिषद गटातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय शिवाजीराव माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद. गटातील संपूर्ण गावातील गटप्रमुख बूथ, प्रमुख, शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख व सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक सर्वांची बोलावण्यात आली होती.
याप्रसंगी मा.जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांनी गटप्रमुख काची व्याख्या समजून सांगितली. तसेच गटप्रमुख करावे याबद्दल माहिती दिली.
तसेच बूथ प्रमुख गटप्रमुख व शाखा प्रमुख यांच्या समन्वयातून शिवसेना पक्षाची बांधणी कशा पद्धतीने करायची या बाबतीत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी या भागातील बऱ्याचशा शिवसेनेच्या पदाधिकारी आपले मनोगत व्यक्त केले.
माननीय जिल्हाप्रमुख शिवाजी माने साहेब यांच्या सूचनेनुसार भविष्यात शिवसेनेची बांधणी करणार हा विश्वास व्यक्त केला.
यामुळे निलंगा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू असे आश्वासन शिवसेना तालुका प्रमुख अविनाश दादा रेश्मे यांनी दिले.
यावेळी, तालुका प्रमुख अविनाशदादा रेशमे तसेच औसा तालुका संघटक रोहित गोमदे पाटील, माजी नगरसेवक सतीश देशमुख,कार्यालय प्रमुख दिनेश बोरा,श्याम जाधव, बालाजी माने, सरपंच बालाजी मोहिते , शेषेराव मनाळे, अनिल बिरादार,अजित मनाळे, अनंत इगळे, विठ्ठल मनाळे, बाबू देशमुख, अजित पवार, गंगाराम इंगळे,दत्तात्रय कांबळे,आत्माराम मुळे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
हे पण वाचा – कांद्याचे भाव अचानक कमी झाल्याचे नेमकं कारण काय?
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ईयत्ता १ली ते १२ वी पर्यंतची सर्व पुस्तके फ्री मध्ये उपलब्ध
चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक ! वाचा सविस्तर..
OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !