इंदापूर / प्रतिनिधी :- अभिजीत देवकर – इंदापूर तालुक्यातील उजनी धरण बॅक वॉटरच्या गावां-गावांमधून विहीरींवरील सिंचन क्षेत्र हे लाभक्षेत्रातून वगळण्यासाठी शेतकऱ्यांचे संमतीचे अर्ज भरुन घेण्याची मोहीम जलसंपदाकडून सध्या राबविली जात आहे. या अर्ज मोहिमेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने या संबंधीचे दि. १५/६/२१ रोजीचे परिपत्रक मागे घ्यावे, असे पत्र भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना शनिवारी (दि.२८) रोजी पत्र पाठविले आहे.
पिंपरी खुर्द, पडस्थळ, माळवाडी, शिरसोडी, कालठण, गलांडवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी आज दि.२८ रोजी हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर येथे भेट घेतली व जलसंपदाच्या अर्जावर स्वाक्षरी घेण्याच्या मोहिमेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. शेतकर्यांशी चर्चा केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना पत्र पाठवून शेतकऱ्यांची नाराजी कळविली.
विहिरींद्वारे भिजलेल्या सर्व प्रकारच्या पिकांवरील शासनाकडून आकारण्यात येणारी सिंचन पाणीपट्टी सन २००९ च्या शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे उजनी धरण बॅक वॉटरच्या शेतकऱ्यांकडून विहिरींखालील भिजणारे क्षेत्र हे उजनी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातून कमी करण्याची मोहीम अन्यायकारक असून, यामध्ये शासनाचा कोणता हेतू आहे? असा सवालही हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांची चर्चा करताना उपस्थित केला आहे.
हे पण वाचा – चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक ! वाचा सविस्तर..
अधिक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर यांचे अंतर्गत कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भिमानगर यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील ( बॅकवॉटर) विहीरींवरील सिंचीत क्षेत्र वगळण्याबाबत शेतकऱ्यांकडून विशिष्ट नमुन्यामध्ये अर्ज भरुन घेतले जात आहेत. जर शेतकऱ्यांनी अर्ज भरुन दिले नाहीत तर सदर विहिरीवरील सिंचन क्षेत्रासाठी उजनी जलाशयाच्या सिंचन क्षेत्रासाठी आकारल्या जाणाऱ्या दराने पाणीपट्टी आकारली जाईल, असे कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सूचित केले जात आहे, ही बाब चुकीची असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.
जर शेतकऱ्यांनी अर्ज भरुन स्वाक्षरी केली तर त्यांना उजनी जलाशयाच्या सिंचन लाभापासून वंचित ठेवले जावू शकते किंवा त्या दृष्टीने जलसंपदा विभागाचा विचार चालू असल्याचे सदर मोहिमेवरून निदर्शनात येत आहे.
हे पण वाचा – घेवडा उत्पादकाने २० गुंठेत ६ लाख मिळवले, वाल लागवड माहिती !
जलसंपंदाच्या अर्ज मोहिमेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जलसंपदाचे कर्मचारी हे शेतकऱ्यांना नमुन्यामध्ये अर्ज भरुन द्या नाही तर उजनी जलाशयाची चालू दराने पाणी पट्टी आकारणीस तयार रहा, असे कोणत्या अधिकाराने सांगत आहेत? पाणीपट्टी दर ठरविण्याचा अधिकार केवळ महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणास आहे. सदर सर्व बाबतीत विरोधाभास दिसून येत असल्याने इंदापूर तालुक्यातील व शेजारील तालुक्यातील बॅक वॉटर भागातील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील सिंचन क्षेत्र हे लाभ क्षेत्रातून वगळण्याचे अर्ज भरुन घेणे त्वरीत थांबविणेबाबत संबधितांना सूचना देऊन सहकार्य करावे, असे हर्षवर्धन पाटील यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील बॅकवॉटर भागात संमती अर्ज भरुन घेण्याच्या मोहीमेमुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
हे पण वाचा – एका माणसाने १.२ लाखात फक्त १२ आंबे विकत घेतले, त्याचे कारण जाणून घ्या !
Ujani Dam information in marathi – मला वाचवा ! तुमचाच यशवंतसागर जलाशय ! उजनी धरण !!
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
या साईट ला सब्सस्क्राईब करा !
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा
OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!