नवी दिल्ली :- केंद्र सरकारने 52 लाख कर्मचारी आणि 65 लाखपेक्षा अधिक निवृत्तीवेतनधारकांसाठी चांगली बातमी दिली आहे. केंद्र सरकार 1 जुलै 2021 पासून 7 व्या वेतन आयोगाच्या नव्या शिफारशी प्रमाणे महागाई भत्ता देणार आहे. मागील वर्षभरापासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर केंद्र सरकारने पुढील महिन्यापासून हा महागाई भत्ता देणार असल्याची माहिती संसदेत दिली. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यापासून वाढीव वेतन मिळणार आहे. आयोगाच्या शिफारसीप्रमाणे महागाई भत्ता आता 11 टक्क्यांवरुन वाढून 28 टक्के होणार आहे.
सद्यस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 17 टक्के महागाई भत्ता दिला जातो. जुलैपासून डीएत वाढ झाल्यास जानेवारी ते जून 2020 पर्यंतचा प्रलंबित डीएत 3 टक्क्यांची वाढ होईल. जुलै ते डिसेंबर 2020 पर्यंत 4 टक्के वाढ आणि जानेवारी ते जून 2021 पर्यंत 4 टक्के अशी एकूण 11 टक्के वाढ होणार आहे.
प्रत्येक वर्षाला 32 हजार रुपयां पेक्षा अधिकचा महागाई भत्ता मिळणार आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्याच्या वेतनात 3 प्रमुख गोष्टींचा समावेश करण्यात आलाय. यात मूळ वेतन, भत्ता आणि कपातीचा भाग यांचा समावेश आहे. वेतन मॅट्रिक्सनुसार कर्मचाऱ्यांचं कमीतकमी मूळ वेतन 18,000 रुपये आहे. मूळ वेतनात वाढ झाल्यानं प्रति महिना 2,700 रुपयांची वाढ होणार आहे. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांना वर्षाला एकूण 32 हजार 400 रुपये महागाई भत्ता मिळेल.
NPS कर्मचाऱ्यांना वाढीव मेडिकल क्लेम मिळणार.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्यासोबतच आणखी लाभ मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने नवोदय विद्यालय स्कूलमध्ये (एनवीएस) कार्यरत कर्मचाऱ्यांना वाढिव मेडिकल क्लेम देण्याची माहिती दिली होती. यानुसार प्राध्यापकांच्या मेडिकल क्लेमची मर्यादा 5000 वरुन वाढून 25 हजार रुपये करण्यात आलीय. तसेच सरकारी किंवा सीजीएचएस मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेतल्यास 25,000 रुपयांपर्यंतचा मेडिकल क्लेमही करता येतो.
सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना जुलै 2021 पासून महागाई भत्ता! काय फायदा होणार सविस्तर जाणून घ्या ?
Best CNG Car – आता कारचे स्वप्न पूर्ण करा स्वस्तात, Alto पेक्षा पण जास्त या कारला मिळतेय ग्राहकांची पसंती; किंमतही कमी, मायलेजही जबरदस्त ?
Agneepath Bharti Yojana ! ३० हजार पगार, ४४ लाखांचा विमा आणि ४ वर्षांची नोकरी इंडियन आर्मी भरती 2022
[Top 16] Business Ideas In Marathi कमी भांडवलामध्ये
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–७८४१९१३४५८ / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
📲7841913458