मध्यप्रदेशः 4 Legged Baby Girl Born निसर्गाचा चमत्कार मध्यप्रदेश मध्ये बघायला मिळाला आहे. विचित्र घटना मध्यप्रदेश समोर आली आहे. एका महिलेने चक्क चार पाय असलेल्या बाळाला जन्म दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
डॉक्टरांनी चिमुकलीला ICU विभागात दाखल केले आहे. दरम्यान, महिलेच्या नातेवाईकांनी मुलीला बघण्यासाठी इस्पितळात गर्दी केली आहे. तर, वैज्ञानिक भाषेत हे एक शारिरीक व्यंग असून त्याला इशियोपेगस असं म्हणतात, अशी माहिती चिमुकलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ग्वालिअर येथील कमलराजा रुग्णालयात एका महिलेने चार पाय असलेल्या मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर सध्या वेगाने मुलीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
इशियोपेगस असं या आजाराचे नाव –
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक शारिरीक व्यंग आहे. वैज्ञानिक भाषेत याला इशियोपेगस असं म्हणतात. यामध्ये गर्भात वाढणाऱ्या अर्भकाच्या शरीराच्या खालच्या भागाचा अतिरिक्त विकास होत जातो. एक लाख बाळातून एकाला असा आजार होतो. शरिराचा अतिरिक्त भाग शस्त्रक्रिया करुन ही आपण काढून टाकू शकतो, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
मुलीचे दोन पाय काढणार –
चिमुकलीचे शस्त्रक्रिया करुन दोन पाय काढून टाकण्यात येणार आहे. मात्र, सध्या हीं मुलागी पूर्णपणे सुदृढ आहे मुलीच्या सर्व चाचण्या करण्यात येत आहेत. असं रुग्णालयातून सांगण्यात येत आहे.
ग्वालियअर येथील सिकंदर कंपू येथे राहणारी आरती कुशवाह हिने या मुलीला जन्म दिला आहे. आरतीला आधीही दोन मुली आहेत, अशी माहिती तिच्या बहिणीने दिली आहे. आता तिसरी मुलीचा जन्म चार पायांसोबत झाला आहे. त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. आरतीच्या कटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. ती इतका खर्च करु शकत नाही. त्यामुळं तिचे कुटुंब सरकारकडून मदतीची मागणी करत आहेत.
आमच्या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये जॉईन व्हा
रुग्णालयात गर्दी
चार पायांच्या मुलीला पाहण्यासाठी लोकांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. सोशल मीडियावरही फोटो व्हायरल होत आहेत. रुग्णालयातील दुसऱ्या रुग्णांचे कुटुंबीयही या मुलीला पाहण्यासाठी वॉर्डमध्ये आले आहेत. तर काही नागरिक या मुलीला चमत्कारी बोलत आहे तर काही जण तिला दैवी अवतार मानत आहे. मात्र, ही एक वैज्ञानिक घटना आहे. 4 Legged Baby Girl Born
हे पण वाचा …
- Sim Card: ड्यूल सिम वापरणाऱ्यांची होणार अडचण? ‘हे’ आहे कारण..
- थरारक… स्टॉयनिसने मारलं निकोलसने खेचलं, अखेर आवेशने सोडवला आरसीबीचा पेपर!
- कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?
- आईच्या मर्जीविरोधात मुलीने केला विवाह, मग सगळं कुटुंबच.
- dream 11 today match winner ड्रीम 11 जिंकून मधुबनीमध्ये मजुराचा मुलगा बनला तिसरा करोडपती,
- Sim Card: ड्यूल सिम वापरणाऱ्यांची होणार अडचण? ‘हे’ आहे कारण..
- सिंचन अनुदान योजना: शेतकऱ्याला २४ लाख रुपये अनुदान ! शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन, अर्ज कोठे करावा? आवश्यक कागदपत्रे
- अतिशय दुर्दैवी घटना : जिमला जात असताना सरकारी कर्मचाऱ्याचा दुचाकी अपघातात मृत्यू
- पोस्ट ऑफिस ‘या’ लोकांना देत आहे 16 लाख 28 हजार रुपये ; जाणून घ्या नेमकं कारण
- दुर्देवीघटना : इकडं आई ज्वारी काढतं होती, तिकडं ३ भावंडानी जीव सोडला;
- कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?