इंदापूर/प्रतिनिधी -पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने “व्यर्थ न हो बलिदान” देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा कुटुंबियातील व्यक्तीचा सन्मान सत्कार कार्यक्रम सोमवारी दिनांक 16 रोजी राजगुरुनगर येथे पार पडला. या कार्यक्रमात इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचे प्रवेश झाले. सुराज्य निर्माण सेना

राहुल गांधींचा वाढदिवस ‘संकल्प दिन’ म्हणून इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे रोपे व मास्क वाटप करून साजरा.

यात प्रामुख्याने सुराज्य निर्माण सेना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत प्रवेश केला. आकाश पवार हे राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका उपाध्यक्ष होते. त्यांनी 2017 मध्ये निमगाव केतकी गणातून पंचायत समिती लढवली आहे. सुराज्य निर्माण सेना इंदापूर तालुक्यामध्ये 15 शाखा आहेत .ते कळंब गाव चे सुपुत्र आहेत.

हे पण वाचा – घेवडा उत्पादकाने २० गुंठेत ६ लाख मिळवले, वाल लागवड माहिती.

याच बरोबर इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील युवराज तानाजी गायकवाड यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य इंदापूर तालुका अध्यक्ष आहेत.

ते पिंपरी गाव व पंचक्रोशीत सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
यासह नरवटवाडी येथील पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर संतोष दत्तात्रय होगले यांनीदेखील पक्षात प्रवेश केला.

त्यांचा ही बॅकवॉटर क्षेत्रात दांडगा संपर्क आहे.

हे पण वाचा – चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक ! वाचा सविस्तर..

जिल्हा अध्यक्ष आमदार संजय जी जगताप यांनी सर्वांचे पक्षांमध्ये स्वागत केले यावेळी माजी खासदार अशोक आन्ना मोहोळ , माजी जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी प्रमुख उपस्थित होते.

हे पण वाचाया अभिनेत्री स्वतःच्या पतीच्या पहिल्या लग्नात किती वयाच्या होत्या ? एक तर 1 वर्षाचीच होती.

काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे व पक्षाला मानणारा वर्ग इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. येणाऱ्या काळात देखील सर्वसामान्य मध्ये काम करणाऱ्यांना संधी देऊन, त्यांच्यामागे पक्षाची ताकद उभा करू. असे मत इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी व्यक्त केले.

यावेळी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर इंदापूर शहर अध्यक्ष चमन भाई बागवान इंदापूर विद्यार्थी संघटना अध्यक्ष शंभूराजे साळुंखे पुणे जिल्हा सरचिटणीस जकिर भाई काजी निवास आण्णा शेळके महादेव लोंढे दत्तात्रेय देवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

 🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

या साईट ला सब्सस्क्राईब करा !

फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय